मधुरा उठून खाली आली तेव्हा सकाळचे ९ वाजून गेले होते. सौरभ कधीच ऑफिसला गेला होता. ती चहाचा कप घेऊन डायनिंग टेबल वर बसली. काचेच्या दरवाजातून दिसणाऱ्या मलूल गार्डनकडे बघून तिने दीर्घ सुस्कारा सोडला. आर्यन आणि रिया युनिव्हर्सिटी ला जाऊन एक महिना झाला तरी अजूनही तिला मुलं घरात नसण्याची सवय होत नव्हती. […]