काही वर्षांपूर्वी UK मध्ये रहात असतांना एकदा माझ्या मैत्रिणीचे आई वडील तिला भेटायला आले. त्यांना फिरवायला म्हणून ती खास केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला घेऊन गेली. “वीकेंडला घरी एकटी बसून काय करशील?” म्हणत तिने मलाही सोबत ओढून नेलं. चालून चालून दमल्यावर आम्ही तिथल्या नदीत punting tour घ्यायची ठरवली. यात बोटीला वल्ह्याऐवजी एका लांब […]