Category: मराठी

Fiction and more in Marathi…

किस लिये जिते है हम, किसके लिये जिते है?

मी काही दिवसांपूर्वी एक फिटनेस क्लास सुरु केला. या फिटनेस क्लास चं वैशिष्ट्य म्हणजे तो खास आयांसाठी बनवलेला आहे. थोडक्यात काय तर प्रेग्नन्ट असलेल्या किंवा डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी तो सुरक्षित आहे. तशीही मी कधीच व्यायाम करण्यात उत्साही नव्हते. पण त्यातही डिलिव्हरी झाल्यापासून मला जख्ख म्हातारी झाल्यासारखं वाटावं इतकी वाईट परिस्थिती […]

तुम्हाला कोण व्हायचंय, समर्थक, विरोधक की प्रेक्षक? (पु. लं. ची माफी मागून)

व्हाट्सअँप मुक्त विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासून मोबाईल धारकांसमोर एक नवाच पेच उभा राहिलाय. आणि पूर्वी जिथे नुसत्याच गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस वर भागत असे, तसं न राहता व्हाट्सअँपचा ग्रुप मेंबर म्हणजे समर्थक, विरोधक की प्रेक्षक? असा सवाल उभा राहीला. कुठलाही ग्रुप घ्या, मग तो फॅमिली ग्रुप असेल, नाहीतर पंचवीस वर्षांपूर्वी शाळा संपलेल्या […]

मंगळ

अक्षय भाषा कथा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालेली कथा. वैदेहीची बोटं पुस्तकांवरून फिरत होती. मध्येच थांबून ती एखादं पुस्तक काढायची. त्याच्या मागचं वर्णन वाचून परत ठेवायची. अचानक तिची नजर मिशेल ओबामाच्या ‘बिकमिंग’ पुस्तकावर गेली. मिशेल ओबामा, एवढी उच्च शिक्षित असून सुद्धा शेवटी नवऱ्याच्या राजकारणातील महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडलं. वैदेही […]

भविष्यातल्या हिऱ्यांचं काय?

“घांग्रेकर सर” या दोन शब्दांत एवढा उत्साह भरलेला होता की कोणीही म्हणावं “बस नाम ही काफी है”. सरांनी एका हाती यावल आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये सांस्कृतिक सुवर्णकाळ आणला असं मी म्हटलं तर त्यात कोणालाही अतिशयोक्ती वाटणार नाही. आयुष्यात काहीतरी वेगळा बदल आणणारे फार थोडे लोक आपल्याला भेटतात. आणि आयुष्याला पूर्णपणे […]

मरगळलेली सकाळ

डोळे उघडून वेळ बघितली, सकाळचे सव्वा आठ. सोमवार ते शुक्रवार साडेआठच्या अलार्मला सुद्धा न उघडणारे डोळे शनिवारी सकाळी कसे अचूक लवकर उघडतात म्हणून चिडचिड झाली. हट्टाने थोडा वेळ तशीच पडून राहिले. गेले काही महिने ऑफिसमध्ये भरपूर काम असल्याने शनिवार उजाडेपर्यंत बॅटरी संपलेली असते. पण त्यातही मागचा आठवडा आणखीच धावपळीत गेला […]

माझी खाद्यंती

संस्कार म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे आई, वडील, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी इत्यादी उभे राहतात. पण कळत नकळत आपल्या संपर्कात येणारे कितीतरी लोक आपल्यावर संस्कार करून जातात. माझ्यावर झालेल्या खाद्यसंस्कारात जाणते अजाणतेपणी अनेकांनी हातभार लावला. मुळातच घरात खाण्याची आणि खिलवण्याची आवड असल्याने खवय्येगिरी वारसा हक्काने मिळाली. गावात कुटुंबाला घेऊन जाण्यासारखं एकही […]

राणीची लढाई

मिट्ट काळोखी रात्र सावल्या गडद येती चाल करुनी ना कोणी सेनापती ना कुठला शिपाई एकटीच लढते राणी तिची लढाई   तीच हत्ती घोडे, तीच प्यादी कधी दिडक्या चालीचे आक्रमण कधी देते स्वतःचा बळी एकटीच लढते राणी तिची लढाई   राजाचे साम्राज्य, त्याची महत्वाकांक्षा परी राजा न सोडी कधी त्याची कक्षा राजासाठी जाई रणांगणी […]

व्हेकेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख —— ट्रेडमिल धावते आहे. डोळ्याचा virtual reality गॉगल समुद्र किनारा दाखवतोय. किनाऱ्याने आपण धावतोय, ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने. कानाचे हेडफोन समुद्राच्या लाटा ऐकवताहेत. वाऱ्याने किनाऱ्यावरची झाडं हलतांना दिसतात. पण तो वारा आपल्या पर्यंत पोहोचतच नाही. आपल्या अंगातून घामाच्या धारा वाहत राहतात. […]

हरवलेलं बालपण – लायब्ररी

का कोण जाणे, पण आज त्या लायब्ररीची प्रकर्षाने आठवण झाली. छोटंसं गाव, त्या गावात दोन लायब्ररी, एक मोठ्या माणसांची, एक लहान मुलांची. लहान असतांना मी आणि दादा आईसोबत मोठ्या माणसांच्या लायब्ररीत जात असू. ओळीने मांडलेली आणि आमच्या दृष्टीने आभाळाला टेकलेली कपाटं आणि त्यात काठोकाठ भरलेली पुस्तकं. आईने त्यातले एक पुस्तक […]

स्वप्नं

आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित […]