मूठ घट्ट धरून ठेवण्याची कुठली ही धडपड, कशासाठी?
वाळू तर कधीच निसटून गेली आहे.
मग उरलंय काय?
अनेक वर्षांपूर्वीची शिळी हवा.
काय साध्य होणार ती हवा पकडून ठेऊन?
हि कसली अनामिक भीती तिला सोडून देण्याची?
नसेल पटत तर डोकावून बघ, बोटांच्या फटीतून
उरलंय का काही आत? नाही ना?
सैल कर ती बोटं, मोकळा श्वास घे.
जुनं सोडून दिलं नाही तर नव्यासाठी जागा कशी होणार?
वाळलेल्या फुलांची माती झाली
पण इतक्या वर्षांत अगणित फुलं फुललीत
हातात जागा आहे का नव्या फुलांसाठी?
ती तर जुन्याच मातीने भरली आहे
मिळून जाऊ दे तिला तिच्या जन्मदात्या धरतीत
गंध घे नवीन फुलांचा श्वास भरून
शिळ्या हवेच्या वासावर किती वर्ष जगणार?