बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख —— ट्रेडमिल धावते आहे. डोळ्याचा virtual reality गॉगल समुद्र किनारा दाखवतोय. किनाऱ्याने आपण धावतोय, ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने. कानाचे हेडफोन समुद्राच्या लाटा ऐकवताहेत. वाऱ्याने किनाऱ्यावरची झाडं हलतांना दिसतात. पण तो वारा आपल्या पर्यंत पोहोचतच नाही. आपल्या अंगातून घामाच्या धारा वाहत राहतात. […]
हरवलेलं बालपण – लायब्ररी
का कोण जाणे, पण आज त्या लायब्ररीची प्रकर्षाने आठवण झाली. छोटंसं गाव, त्या गावात दोन लायब्ररी, एक मोठ्या माणसांची, एक लहान मुलांची. लहान असतांना मी आणि दादा आईसोबत मोठ्या माणसांच्या लायब्ररीत जात असू. ओळीने मांडलेली आणि आमच्या दृष्टीने आभाळाला टेकलेली कपाटं आणि त्यात काठोकाठ भरलेली पुस्तकं. आईने त्यातले एक पुस्तक […]
स्वप्नं
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित […]