Tag: Marathi blog

आनंदी माणसाचा सदरा

काही वर्षांपूर्वी UK मध्ये रहात असतांना एकदा माझ्या मैत्रिणीचे आई वडील तिला भेटायला आले. त्यांना फिरवायला म्हणून ती खास केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला घेऊन गेली. “वीकेंडला घरी एकटी बसून काय करशील?” म्हणत तिने मलाही सोबत ओढून नेलं. चालून चालून दमल्यावर आम्ही तिथल्या नदीत punting tour घ्यायची ठरवली. यात बोटीला वल्ह्याऐवजी एका लांब […]

मसालेभात

Masale Bhat

लग्नांचा season सुरु झालाय आणि लग्नातल्या जेवणाचा पण. असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दी तुन वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं […]

कूपमंडूक

Kupmanduk

काही दिवसांपूर्वी मला WhatsApp वर एक जोक आला. अमित फेसबुक वर मेसेज टाकतो कि ट्रम्प प्रेसिडेंट झाला, आता अमेरिकेचं आणि पर्यायाने जगाचं कसं होणार, त्यावर मिलिंद त्याला कंमेंट टाकतो, “तू शनिवार पेठेत राहतोस तिथे ३ दिवस पाणी येणार नाहीये, त्याची चिंता कर”. आणि एकदम माझ्या डोळ्यांसमोर हरी अण्णा उभे राहिले. […]

बुवा आहे तिकडे

बुवा आहे तिकडे

“भांडी घासायला एक बाई मिळाली असती तर वाट्टेल तेवढे दिवस मी आनंदाने इथे राहिले असते.” नॅपकिन ला हात पुसत आई म्हणाली. लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढत तेजस ने आई कडे पाहिलं, “तुला किती वेळा सांगितलंय डिश वॉशर लावत जा म्हणून.” “अरे इन मीन ८-१० तर भांडी असतात, तेवढ्या साठी कशाला […]