काही वर्षांपूर्वी UK मध्ये रहात असतांना एकदा माझ्या मैत्रिणीचे आई वडील तिला भेटायला आले. त्यांना फिरवायला म्हणून ती खास केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला घेऊन गेली. “वीकेंडला घरी एकटी बसून काय करशील?” म्हणत तिने मलाही सोबत ओढून नेलं. चालून चालून दमल्यावर आम्ही तिथल्या नदीत punting tour घ्यायची ठरवली. यात बोटीला वल्ह्याऐवजी एका लांब […]
तन्वी
“आई मला ना भरतनाट्यम शिकायचं” आयुषी माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली. कुठलीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे मनवून घेण्याची आयुषीची ही नेहमीची स्टाईल. “भरतनाट्यम!” मी चकित होत विचारलं. “हो, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तन्वी, ती शिकते, आणि खूप छान डान्स करते, मला पण शिकायचं”. तिच्याकडून तन्वीचं नाव मी हल्लीच ऐकायला लागले होते. […]
रियुनियन
मेलबॉक्स उघडल्यावर रागिणीला सगळ्यात पहिले शाळेच्या रियुनियन ची ई-मेल दिसली. गेली अनेक वर्षं रागिणी नं चुकता शाळेच्या रियुनियन्सना जात होती. अमोल ने पुढाकार घेऊन ते सुरु केलं होतं. १०वी झाल्यावर सगळ्यांचीच पांगापांग झाली होती. कॉलेज संपवून नोकरी लागेपर्यंतचे दिवस कुठे गेलेत कोणालाच कळलं नव्हतं. नोकरीत स्थिरस्थावर होऊ लागल्यावर जसजसे एकेकांचे लग्न होऊ लागले, […]
वैष्णोदेवी
मी पहिल्यांदा वैष्णोदेवी ला गेले तेव्हा खूप लहान होते, जेमतेम ६-७ वर्षांची असेन. एका लोकल टुरिस्ट कंपनी सोबत आम्ही १५ दिवसांच्या वैष्णोदेवी, जालंधर, दिल्ली, आग्रा आणि आणखीही काही शहरं असलेल्या मोठ्या ट्रिपला गेलो होतो. पण वैष्णोदेवी माझ्या विशेष लक्षात राहिली. त्या टूर कंपनीने ट्रेनचा एक डब्बाच बुक केला होता. १५ दिवस आमचं तेच […]
चमचाभर कॉफी
“सागर?” मी “yes” म्हणत कॉम्पुटर मधून डोकं काढून वर बघितलं. चाळीशीच्या आस पास चा एक माणूस माझ्या डेस्क च्या बाजूला उभा होता. उंच, बारीक अंगचटीचा, जाड मिशा, २-३ वेळा भेटल्यावरही लक्षात राहणार नाही असा सर्वसामान्य चेहरा. सगळ्यात आधी डोळ्यात भरले ते त्याचे मोठे, पाणीदार डोळे. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोक्यातल्या […]
बॅकबेंचरगिरी
सगळ्यात चांगली मैत्री ही बॅकबेंच वरच होते. कदाचित सगळेच या विचाराशी सहमत नसतील. माझ्या काही ‘चांगल्या’ मित्रांच्या मते, सगळ्यात चांगली मैत्री सिगारेट पितांना होते. पण मी कधी तो अनुभव (सिगारेट पिण्याचा आणि तेव्हा मैत्री होण्याचा, दोन्ही) घेतला नसल्यामुळे, माझ्या मते बॅकबेंच ही मैत्री साठी भन्नाट जागा आहे. माझ्या कमनशिबाने मला या सत्याचा शोध जरा उशिराच […]
Carpe Diem – Sieze the day
Corona मुळे सगळ्या जगावर संकट आलं, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत, अनेक देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पण या रोगाने मला एक गोष्टं नव्याने शिकवली – Carpe Diem (इंग्लिश मध्ये Seize the day) म्हणजे येणारा प्रत्येक दिवस साजरा करा. एखादी गोष्टं जेवढी कमी मिळते तेवढी आपल्याला तिची किंमत जास्त. हापूस आंबे […]
लोकमान्य टिळकांना पत्र
ति. स्व. लोकमान्य टिळकांना साष्टांग नमस्कार, पत्र लिहिण्यास कारण की , गणेशोत्सव सार्वजनिक करण्यासाठी तुमचे आभार मानायचे होते. लहानपणी दर वर्षी तुमच्या पुण्यतिथीच्या भाषणात हे सांगून सुद्धा वर्षानुवर्षे हा सण साजरा करतांना, तो तुम्ही सुरु केलाय हि गोष्ट कुठेतरी विस्मरणात गेली होती. पण घरापासून हजारो मैल दूर राहतांना, एका दिवसासाठी का होईना, […]
मसालेभात
लग्नांचा season सुरु झालाय आणि लग्नातल्या जेवणाचा पण. असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच गर्दी उडालेली असते. गर्दी तुन वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं […]