Category: Poetry

राणीची लढाई

मिट्ट काळोखी रात्र सावल्या गडद येती चाल करुनी ना कोणी सेनापती ना कुठला शिपाई एकटीच लढते राणी तिची लढाई   तीच हत्ती घोडे, तीच प्यादी कधी दिडक्या चालीचे आक्रमण कधी देते स्वतःचा बळी एकटीच लढते राणी तिची लढाई   राजाचे साम्राज्य, त्याची महत्वाकांक्षा परी राजा न सोडी कधी त्याची कक्षा राजासाठी जाई रणांगणी […]

प्रवास

जेव्हा बाहेर भटकणं थांबलं, तेव्हा आतला प्रवास सुरू झाला जेव्हा लोकांना भेटता येईनासं झालं, तेव्हा माझी नव्याने ओळख झाली जेव्हा आसपासचा कोलाहल थांबला, तेव्हा स्वतःशी संवाद साधायला शिकले