Year: 2022

मूठ

मूठ घट्ट धरून ठेवण्याची कुठली ही धडपड, कशासाठी? वाळू तर कधीच निसटून गेली आहे. मग उरलंय काय? अनेक वर्षांपूर्वीची शिळी हवा. काय साध्य होणार ती हवा पकडून ठेऊन? हि कसली अनामिक भीती तिला सोडून देण्याची? नसेल पटत तर डोकावून बघ, बोटांच्या फटीतून उरलंय का काही आत? नाही ना? सैल कर […]

How to Ikigai – Book Review

“तुम्ही यशस्वी आहात का?” असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? आणि ते उत्तर जर “हो” असेल तर तुम्ही तुमचं यश कुठल्या परिमाणात मोजलं? तुमची नोकरी? तुमच्याजवळ असलेले पैसे? बँक बॅलन्स? तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी? तुमची आलिशान कार? की अजून काही? असं समजा की तुमच्या जवळ […]

मंगळ

अक्षय भाषा कथा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालेली कथा. वैदेहीची बोटं पुस्तकांवरून फिरत होती. मध्येच थांबून ती एखादं पुस्तक काढायची. त्याच्या मागचं वर्णन वाचून परत ठेवायची. अचानक तिची नजर मिशेल ओबामाच्या ‘बिकमिंग’ पुस्तकावर गेली. मिशेल ओबामा, एवढी उच्च शिक्षित असून सुद्धा शेवटी नवऱ्याच्या राजकारणातील महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडलं. वैदेही […]

भविष्यातल्या हिऱ्यांचं काय?

“घांग्रेकर सर” या दोन शब्दांत एवढा उत्साह भरलेला होता की कोणीही म्हणावं “बस नाम ही काफी है”. सरांनी एका हाती यावल आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये सांस्कृतिक सुवर्णकाळ आणला असं मी म्हटलं तर त्यात कोणालाही अतिशयोक्ती वाटणार नाही. आयुष्यात काहीतरी वेगळा बदल आणणारे फार थोडे लोक आपल्याला भेटतात. आणि आयुष्याला पूर्णपणे […]

मरगळलेली सकाळ

डोळे उघडून वेळ बघितली, सकाळचे सव्वा आठ. सोमवार ते शुक्रवार साडेआठच्या अलार्मला सुद्धा न उघडणारे डोळे शनिवारी सकाळी कसे अचूक लवकर उघडतात म्हणून चिडचिड झाली. हट्टाने थोडा वेळ तशीच पडून राहिले. गेले काही महिने ऑफिसमध्ये भरपूर काम असल्याने शनिवार उजाडेपर्यंत बॅटरी संपलेली असते. पण त्यातही मागचा आठवडा आणखीच धावपळीत गेला […]