स्वप्नं

आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित […]

प्रवास

जेव्हा बाहेर भटकणं थांबलं, तेव्हा आतला प्रवास सुरू झाला जेव्हा लोकांना भेटता येईनासं झालं, तेव्हा माझी नव्याने ओळख झाली जेव्हा आसपासचा कोलाहल थांबला, तेव्हा स्वतःशी संवाद साधायला शिकले

Bigg Boss – Masterchef

शेवटचा अर्धा तास!!! बिग बॉस ने आवाज दिला.  बिग बॉस – मास्टरशेफ या नवीन शो मध्ये येऊन त्यांना सगळ्यांना आता २ आठवडे झाले होते. सगळ्यांना एका घरात बंद करून ठेवलं होतं आणि रोज तिथे कूकिंग competition चे नवीन नवीन राऊंड्स सुरु होते. आज त्यांचा ओपन किचन राऊंड होता. थोडक्यात आज त्यांना हवं […]